बायकोचा कारनामा सांगताना पती लाजला ,पोलिसांनी बोलतं केलं अन ..

Spread the love

सोशल मीडियावर सध्या एका प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून उत्तर प्रदेशातील कानपूर येथील ही घटना आहे. सदर घटनेनंतर पीडित पतीने पत्नीच्या विरोधात तक्रार दाखल केलेली असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, आजाद असे या पतीचे नाव असून त्याची पत्नी आणि तो यांच्यात नेहमी भांडण होत असायचे. 14 जून रोजी अशाच पद्धतीने त्यांचे भांडण झाले त्यानंतर पती झोपी गेलेला होता त्यावेळी त्याची पत्नी तिथे ब्लेड घेऊन आली आणि त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून तिने तेथून पलायन केले . लाजेच्या भीतीने त्याने सुरुवातीला हा प्रकार कोणालाही सांगितला नाही मात्र पोलीस ठाण्यात येऊन त्याने आपल्या पत्नीच्या या कारनाम्याची माहिती दिलेली आहे.

कानपूरचे एसीपी अभिषेक पांडे यांनी याप्रकरणी माहिती देताना पीडित जखमी पतीने पोलिसात तक्रार दाखल केलेली असून त्याच्या पत्नीने त्याचा ब्लेडच्या माध्यमातून प्रायव्हेट पार्ट कापलेला आहे असे म्हटलेले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून आरोपी महिलेचा शोध सध्या सुरू आहे.


Spread the love