महाराष्ट्रात कायद्याचे तीन तेरा , पोलीस पाटलाला शेतात बोलावलं अन काही क्षणात..

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना समोर आलेली असून पोलिसांचा मित्र म्हणून ओळख असलेले पोलीस पाटील यांच्यावरच पोलीस तक्रारीत नाव घातल्याचा ठपका ठेवत चार जणांनी त्यांच्यावर कोयता आणि खुरप्याने हल्ला केलेला आहे त्यात या पोलीस पाटलांचा मृत्यू झालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पोवाची वाडी येथील ही घटना आहे.

उपलब्ध माहितीनुसार, संदीप ज्ञानदेव पाटील ( वय 41 ) असे मयत व्यक्तीचे नाव असून शनिवारी रात्री उशिरा त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आलेला आहे. पोलीस संघटना आणि कुटुंबीयांच्या संतापामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

शनिवारी रात्री संशयित असलेला आरोपी रोहित निवृत्ती पाटील याच्यासोबत आपले भांडण झालेले आहे म्हणून त्याला समजावून सांगण्यासाठी सुरेश गुरव याने पोलीस पाटील संदीप यांना बोलावून घेतलेले होते. संदीप पाटील हे गुरव याच्या शेतात संशयित रोहित पाटील ,निवृत्ती राजाराम पाटील आणि अरुण राजाराम पाटील व योगेश अरुण पाटील यांच्यासोबत चर्चा करत असतानाच आरोपींनी संदीप यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या मानेवर सपासप वार केले त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर आरोपी रोहित पाटील याने स्वतःहून पोलिसात हजर होत त्याने कबुली दिलेली असून इतर तीन जणांना देखील अटक करण्यात आलेली आहे .


Spread the love