शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक खळबळजनक असा प्रकार पिंपरीत समोर आलेला असून होस्टेलवर राहणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील भाषेत बोलत तिचे काही अश्लील फोटो पाठवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 16 जून रोजी बावधन येथील एका हॉस्टेलमध्ये ही घटना समोर आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , हिंजवडी पोलिसात या प्रकरणी तक्रार देण्यात आलेली असून शंकर नामदेव सणस ( राहणार बावधन) असे याप्रकरणी आरोपीचे नाव आहे . फिर्यादी महिला हॉस्टेलवर राहून काम करतात आणि आरोपी देखील याच हॉस्टेलवर राहतो . त्याने फिर्यादीला फोन करून अर्वाच्च भाषेत बोलत फिर्यादी यांना शिवीगाळ केली आणि काही अश्लील फोटो पाठवत फिर्यादी यांचा विनयभंग देखील केलेला आहे. सदर प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.