लग्नघरात घुसून पाच जणांची हत्या करून स्वतःवरही झाडली गोळी

Spread the love

उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला असून उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यामध्ये एका लग्नघरात थोरल्या मुलाने चार सदस्यांसह पाच जणांची हत्या केलेली आहे. मयत व्यक्तींमध्ये एक दिवसांपूर्वीच विवाह झालेल्या दांपत्याचा देखील समावेश आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मैनपुरी जिल्ह्यातील किशनी पोलीस ठाणे हद्दीतील गोकुळपूर गावातील वऱ्हाड लग्नकार्य आटोपल्यानंतर घरी परतलेले होते. दिवसभर लग्नात व्यस्त असल्याकारणाने कुटुंबातील सगळे लोक दमून झोपी गेलेले होते त्यावेळी तिथे 28 वर्षांचा शिववीर नावाचा एक व्यक्ती आला आणि त्याने धारदार शस्त्राने सर्वांवर हल्ले केले. त्याने केलेल्या हल्ल्यामध्ये शिववीर याचा लहान भाऊ भुलन यादव ( वय 25), सोनू यादव ( वय 21 ), सोनूची पत्नी सोनी , मेहुना सौरभ ( वय 23 ) आणि फिरोजाबाद येथील लग्नासाठी आलेला मित्र दीपक हे सर्वजण जागीच ठार झालेले आहेत. सोनू आणि सोनी हे या नवदांपत्याचा शुक्रवारीच विवाह झालेला होता.

आरोपीने पाच जणांची हत्या केल्यानंतर पत्नी डोली ( वय 24 ) आणि मामी सुषमा ( वय 35 ) यांच्यावर देखील हल्ला केला मात्र त्या हल्ल्यांमध्ये बचावलेल्या असून शिववीर याने त्यानंतर गावठी कट्ट्याने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केलेली आहे . सदर घटनेची पोलिसांना माहिती मिळाली आणि ते घटनास्थळी पोहोचले त्यावेळी सहा जणांचा मृत्यू झालेला होता. आरोपीने हा प्रकार का केला हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही .


Spread the love