‘ नर्मदाबाई पटवर्धन ‘ आहे तरी कोण ? अखेर त्याला जामीन मंजूर

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती या प्रकरणातील मुख्य संशयित असलेला सागर बर्वे या रहिवाशाची मंगळवारी जामीनावर सुटका करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे पोलिसांना या प्रकरणी कुठलेही पुरावे सागर बर्वे याच्या विरोधात आढळून आले नाहीत.

मुंबईतील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी सागर बर्वे यांचा जामीन अर्ज मंजूर केलेला असून क्राईम ब्रँचने त्याला अटक केलेली होती मात्र त्याने आपल्याला या प्रकरणात नाहक गोवले गेलेले आहे असे म्हटले होते. सदर प्रकरणात सागर बर्वे याने ही धमकी नर्मदाबाई पटवर्धन नावाच्या प्रोफाईल वरून देण्यात आलेली आहे त्याच्याशी आपला कुठलाही संबंध नाही असे सांगितले मात्र पोलीस देखील त्याचा काही संबंध असल्याचे सिद्ध करू शकले नाहीत . पोलिसांनी ते खाते त्याचेच आहे असा एकही पुरावा न्यायालयासमोर मांडला नाही त्यानंतर न्यायालयाने त्याची जामीनावर सुटका केलेली आहे.

सागर हा एका खाजगी कंपनीत कामाला असून अनालिटिक्स विभागात काम करतो. तो उजव्या विचारसरणीचा समर्थक असून नऊ जून रोजी त्याने सोशल मीडियावर शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी दिली असा त्याच्यावर आरोप होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रमाणे शरद पवार यांना देखील अशी धमकी दिल्यानंतर तक्रार दाखल झाली आणि पोलिसांनी त्याला अटक केली होती.


Spread the love