पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या चर्चा पुणेकरांमध्ये नित्याच्या आहेत असाच एक प्रकार पुण्यात पुन्हा एकदा समोर आलेला असून महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या सेवकाकडे अर्जित रजेचा चेक देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, प्रवीण दत्तात्रय पासलकर ( वय 50 बिगारी वर्ग चार ) याला याप्रकरणी महापालिकेच्या आवारात पकडण्यात आलेले असून तक्रारदार व्यक्ती हे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातून 2022 मध्ये मुकादम म्हणून निवृत्त झालेले आहेत. त्यांच्या शिल्लक अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या बिलाचा चेक देण्यासाठी प्रवीण पासलकर याने एक लाखांची लाच मागितली होती.
तक्रारदार व्यक्ती यांनी लाच देण्याची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 10 64 नंबर वर फोन केला आणि त्यानंतर पथक सक्रिय झाले. पथकाने केलेल्या पडताळणीत आरोपीने लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महापालिकेच्या आवारात लाच घेत असताना प्रवीण पासलकर याला रंगेहात पकडण्यात आले. शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली आहे ..