कोथरूडच्या फ्लॅटवर मित्रांसोबत मैत्रिणीलाही करायची ‘ तसला ‘ आग्रह , नकार मिळताच..

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून एका नामांकित कॉलेजमध्ये सोबत शिक्षण घेत असलेल्या दोन मैत्रिणी एका फ्लॅटवर राहत होत्या. फ्लॅटवर राहत असताना त्यातील एका मैत्रिणीने तिच्याच दुसऱ्या मैत्रिणीचे काही नग्न अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केलेले आहेत. आरोपी तरुणीने हे फोटो चोरून काढले आणि त्यानंतर सोशल मीडियात ते व्हायरल करून दिले. पीडित तरुणीला यामुळे मोठा धक्का बसलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आरोपी तरुणीचे परिसरातील अनेक तरुणांसोबत प्रेमसंबंध होते त्यामुळे ती तिच्या मित्रांना फ्लॅटवर घेऊन यायची याचवेळी पीडित तरुणीची तिने त्यांच्यासोबत ओळख करून दिली आणि त्यांच्यासोबत मैत्री ठेवण्याचा आग्रह केला ज्याला पीडित तरुणीने स्पष्टपणे नकार दिला त्यानंतर तिने सोबत राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणीचे अर्धनग्न फोटो काढले आणि ते मित्रांना पाठवले.

सदर पीडित तरुणीचे हे फोटो अखेर तिच्या कुटुंबीयांपर्यंत आणि मित्र-मैत्रिणी पर्यंत पोहोचल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आणि त्यानंतर कोथरूड पोलिसात याप्रकरणी फिर्याद देण्यात आली. कोथरूडमध्ये एका फ्लॅटवर त्या दोघी राहत होत्या त्यावेळी त्या फ्लॅटवर आरोपी तरुणीचे काही मित्र येत असायचे यायचे त्यावेळी आरोपी तरुणीने आपल्या मैत्रिणीला त्यांच्यासोबत मैत्री ठेवण्याचा आग्रह केलेला होता मात्र तिने नकार दिला म्हणून आरोपी तरुणी ही संतापलेली होती त्यानंतर तिने हा प्रकार केला. कोथरूड पोलिसात सहा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

आरोपी तरुणीने पीडित तरुणीचे काही फोटो तिला चोरून काढले आणि ते तिच्या मित्रांना पाठवून दिले त्यानंतर अज्ञात व्यक्तीनी दोन फेक इंस्टाग्राम अकाउंट काढली आणि त्यावर फिर्यादी तरुणीचे हे अर्धनग्न फोटो वारंवार व्हायरल करण्यात आले. हे फोटो अखेर फिर्यादी तरुणीच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचले आणि हा प्रकार समोर आला. कोथरूड पोलिसात या प्रकरणी फिर्याद देण्यात आलेली असून आरोपी तरुणीसह तिच्या मित्रांवर आणि दोन फेक अकाउंट धारक व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


Spread the love