व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत दागिने घेऊन पळाला , महिला ओळखतही नाही

Spread the love

मुंबईत एक अजब घटना समोर आलेली असून एका 27 वर्षीय महिलेचा कपडे बदलताना चोरून व्हिडिओ काढून सव्वा लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रकार गोरेगाव येथे समोर आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल करण्याच्या भीती घालत या महिलेचे दागिने पैसे घेऊन आरोपी फरार झालेला आहे . पोलिसांनी या प्रकरणी एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे

उपलब्ध माहितीनुसार , सदर महिला ही गोरेगाव इथे राहणारी असून एका अनोळखी व्यक्तीने तिच्या नकळत तिचे कपडे बदलत असतानाचे काही व्हिडिओ काढलेले होते. 19 मार्च रोजी गणेश मैदानात अनोळखी व्यक्तीने या महिलेला अडवत हा व्हिडिओ दाखवला आणि खंडणी मागितली . पैसे दिले नाही तर हा व्हिडिओ व्हायरल करीन असे देखील तो म्हणाला त्यामुळे ही महिला घाबरून गेली तिने तात्काळ तिच्याकडील सव्वा लाख रुपयांचे 27 ग्रॅमचे सोन्याचे कडे ,एक ग्रॅम वजनाची दोन सोन्याची नाणी त्याला दिली आणि व्हिडिओ डिलीट करण्याची विनंती केली मात्र तो पळून गेला.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केलेली असून आरोपीच्या विरोधात विनयभंग , खंडणी असा गुन्हा नोंदवत वनराई पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. त्याने हा व्हिडिओ कुठून काढला ? कुठे या महिलेला भेटला ? त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलेले असून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचण्याचे सर्व प्रयत्न करत आहेत.


Spread the love