सोसायटीतील मुस्लिम व्यक्तीला अडकवण्यासाठी ‘ रिटायर्ड अंकल ‘ चा कारनामा समोर

Spread the love

महाराष्ट्रात पनवेल येथे पीआयएफ या संस्थेसंदर्भात पीआयएफ जिंदाबाद लिहिलेले काही स्टिकर आणि सुतळी बॉम्ब एका गृहनिर्माण सोसायटीत आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी अखेर कारवाई करत त्याला आरोपीला अटक केली असून आरोपी सोसायटीचा सदस्य आहे मात्र त्याने वैयक्तिक कारणातून एक इतर धर्मिय व्यक्तीला अडकवण्याचा उद्देशाने हा प्रकार केल्याचे समोर आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, 25 जून रोजी पनवेल सेक्टर 19 मधील निलागल सोसायटीच्या आवारात पीआयएफ जिंदाबाद असे मेसेज लिहिलेले काही स्टिकर आणि सुतळी बॉम्ब नागरिकांना आढळून आले त्यानंतर दहशतवादी हल्ल्याची भीती असल्याकारणाने पोलिसांपर्यंत प्रकरण गेले आणि खांदेश्वर पोलिसांनी पाहणी करून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

केंद्र सरकारने देशात बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे स्टिकर , दोन सुतळी बॉम्ब , एक विझलेली अगरबत्ती ठेवून रहिवाशांमध्ये भीती पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. सोसायटीच्या एका पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली असून सोसायटीतील इतर सदस्यांसोबत त्याचा वाद असल्याकारणाने त्यांनी हा प्रकार केल्याचे समोर आलेले आहे. सोसायटीचे पदाधिकारी आणि सदस्य यांच्यात वाद झाल्यानंतर अखेर त्याला अटक करण्यात आलेली असून या व्यक्तीचे वय ६८ वर्षे असून नाव एकनाथ केवले असल्याचे समजते.


Spread the love