पुणे शहरात सदाशिव पेठ इथे एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयता घेऊन हल्ला करण्यात आलेला होता. सुदैवाने एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या दोन तरुणांनी मध्यस्थी केली आणि यास अटकाव करत केला त्यामुळे या तरुणीचे प्राण वाचले. तरुणीचे प्राण वाचवणाऱ्या तरुणांचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले मात्र यामुळे पोलिसांवर असलेली जबाबदारी काही कमी होत नाही.
पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी या प्रकरणात लक्ष घातलेले असून आत्तापर्यंत सुमारे सात पोलिसांचे निलंबन करण्यात आलेले आहे. निलंबन झालेल्या पोलिसांमध्ये एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस उपनिरीक्षक आणि दोन हवालदार अशी निलंबित व्यक्तींची माहिती आहे. पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडलेली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर ,पोलीस निरीक्षक गुन्हे मनोज एकनाथ शेंडगे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर विठ्ठल शेंडे ,पोलीस उपनिरीक्षक हसन मकबूल मुलानी ,पोलीस उपनिरीक्षक मारुती गोविंद वाघमारे ,पोलीस हवालदार संदीप जयराम पोटकुले आणि पोलीस हवालदार विनायक दत्तात्रेय जांभळे अशी निलंबित झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हवालदार संदीप जयराम पोटकुले आणि पोलीस हवालदार विनायक दत्तात्रय जांभळे हे सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये अंमलदार म्हणून काम पाहत होते मात्र त्यांनी चार अदखलपात्र गुन्ह्यांची देखील तक्रार गांभीर्याने घेतलेली नाही म्हणून सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये दोन परस्पर विरोधी गुन्हे दाखल झालेले होते. दाखल झालेल्या गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेतली नाही त्यामध्ये हसन मुलानी आणि मारुती वाघमारे हे प्रतिबंधक कारवाई अधिकारी आणि घटनास्थळाची चौकशी प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत होते मात्र त्यांनी यात हलगर्जीपणा केला म्हणून पोलीस आयुक्तांनी तब्बल सात जणांना बडतर्फ केलेले आहे.