देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या गुजरातमधील सुरत इथे समोर आलेले असून प्रियकरासोबत संसार थाटण्यासाठी दिंडोली परिसरात एका मजूर महिलेने तिच्या अडीच वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर मृतदेह लपवून तो बेपत्ता असल्याची बतावणी केलेली आहे . तब्बल चार दिवस पोलिसांची दिशाभूल केल्यानंतर अखेर तिने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे.
नयना मांडवी ( वय 22 वर्ष ) असे आरोपी महिलेचे नाव असून पोलिसांनी मुलाचा मृतदेह हस्तगत करून एका बांधकाम स्थळावरून महिलेला अटक केलेली आहे . छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेली नयना हिचे लग्नापूर्वी एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते मात्र लग्न तिचे दुसऱ्याच एका तरुणासोबत झाले. पतीसोबत मतभेद झाल्यानंतर ती आई आणि अडीच वर्षाच्या मुलासह सुरतला आलेली होती.
सुरतला आल्यानंतर एका बांधकाम स्थळावर ती काम देखील करायची आणि स्वतःचा आणि तिच्या अडीच वर्षाच्या मुलाचा उदरनिर्वाह करत होती. लग्नाआधीच्या प्रियकराला तिने लग्नाबद्दल विचारले मात्र तिला मूल असल्याकारणाने त्याने नकार दिला त्यानंतर 27 जून रोजी वीर याचा या महिलेने गळा आवळून खून केला आणि बांधकाम सुरू असलेल्या लिफ्टच्या जागी त्याचा मृतदेह लपवला आणि त्यावर रद्दी टाकली आणि मुलगा बेपत्ता असल्याचे तिच्या आईला सांगितले. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यावेळी हा प्रकार समोर आलेला आहे .