प्रेमविवाह करून अवघे चारच महिने , अखेर ‘ नको ते ‘ घडलं

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार सोलापूर शहरात समोर आलेला असून राहत्या घरात एका पत्राच्या खोलीत शेडला साडीच्या साह्याने गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या चार महिन्यापूर्वी या तरुणाचा प्रेमविवाह झालेला होता.

उपलब्ध माहितीनुसार, सुरज गायकवाड ( वय 22 राहणार हनुमाननगर भवानी पेठ ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून शनिवारी रात्री ही घटना उघडकीला आलेली आहे. कौटुंबिक वादातून त्याने हा प्रकार केल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांकडून देण्यात आलेली आहे.

मयत सुरज याने अवघ्या चार महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेला होता. घटनेच्या दिवशी खोलीमध्ये त्याची पत्नी होती त्यावेळी त्याने रात्रीच्या सुमारास खोलीतील वाशाला साडीच्या साह्याने गळफास घेतला. घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ त्याला उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. घटनेमागचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नसून कौटुंबिक वादातूनच हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.


Spread the love