महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींचा फसवून विवाह लावला जात असल्याची प्रकरणे समोर येत असून असाच एक प्रकार जळगाव जिल्ह्यात समोर आलेला आहे. चाळीसगाव तालुक्यात एका अल्पवयीन मुलीसोबत हा प्रकार घडलेला असून त्यानंतर विवाहानंतर तिच्यावर अत्याचार देखील करण्यात आलेले आहेत. पतीसह सासरच्या मंडळींच्या विरोधात मेहुनबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
उपलब्ध माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचे वय अवघे पंधरा वर्षे असून चाळीसगाव तालुक्यातील सायगावचा काकाजी राजेंद्र सोळशे या व्यक्तीसोबत मार्च 2023 मध्ये तिचे लग्न लावण्यात आलेले होते. पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे याची सर्वांनाच कल्पना होती मात्र तरीदेखील तिचे लग्न लावून देण्यात आले आणि काकाजी याने तिच्यावर अत्याचार केले त्यानंतर ती अखेर माहेरी निघून आली.
तिच्या सासरचे मंडळी तिला घेण्यासाठी आले त्यावेळी तिने जाण्यास नकार दिला मात्र सासरच्या व्यक्तींनी यावेळी गुपचूप तिला आता नांदायला पाठवा नाहीतर लग्नासाठी केलेला आमचा तीन लाख रुपयांचा खर्च परत द्या अशी धमकी दिली त्यानंतर अखेर पीडित अल्पवयीन मुलीने मेहूनबारे पोलिसात जाऊन तक्रार दिलेली आहे.
मीरा दिलीप लोखंडे, दिलीप बाबुराव लोखंडे, रवींद्र दिलीप लोखंडे ,मनीषा ज्ञानेश्वर वाघ , धीरज दिलीप लोखंडे ,कल्पना राजू वाघ, काकाजी राजेंद्र सोळसे, लताबाई राजेंद्र सोळसे, राजेंद्र तुकाराम सोळसे अशा व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.