महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून जातीवाचक शिवीगाळ केल्यानंतर दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी सातत्याने पाच लाख रुपयांची होत असलेली मागणी आणि त्यानंतर लग्नच जमू देणार नाही अशी धमकी यामुळे घाबरून गेलेल्या एका 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या केलेली आहे . सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील पोसेवाडी येथील हे प्रकरण आहे.
उपलब्ध माहितीनुसार, महेश सुभाष जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून या घटनेनंतर आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी गावातील ग्रामस्थ आणि महिलांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढलेला होता त्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केलेली आहे. महेश जाधव याने आपल्या घराजवळ असलेल्या जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. महेशचा एक भाऊ सुनील जाधव याच्यावर देखील जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झालेला होता. राजकीय हेतूने हा प्रकार करण्यात आलेला असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
महेश जाधव यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्याप्रमाणे सरपंच अंकुश ठोंबरे ,उपसरपंच सागर जाधव यांच्यासह धर्मराज जाधव ,दादासाहेब दुसरेकर ,महेंद्र मोहिते नितीन खुडे यांनी हा खटला न्यायालयातून काढून घेण्यासाठी पाच लाख दे नाहीतर तुझे कुठेच लग्न जमवून देणार नाही. न्यायालयात आल्यावरच तुला बघून घेतो अशी धमकी दिलेली होती त्यामुळे महेश हा घाबरून गेलेला होता. पोलिसांनी तात्काळ सरपंच अंकुश ठोंबरे याला अटक केली असून स्थानिक पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत .