कला केंद्राच्या नावाखाली भलताच प्रकार सुरू असलेल्या एका कला केंद्रावर बीड जिल्ह्यात छापा टाकण्यात आलेला असून केज तालुक्यात हा प्रकार सुरू होता. तिथून अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आलेली असून काही आंबटशौकीन ग्राहकांना देखील अटक करण्यात आलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कलाकेंद्रात न वापरलेले कंडोम सापडलेले असून आरोपी व्यक्ती हा एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे.
उपलब्ध माहितीनुसार, रत्नाकर शिंदे असे या व्यक्तीचे नाव असून केज तालुक्यातील उमरी इथे महालक्ष्मी कला केंद्र इथे हा प्रकार सुरू होता. पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान तिथे छापा टाकला त्यावेळी अनेक रूममध्ये पार्टी डान्स सुरू होता त्यावेळी तिथे एका राजकीय पक्षाचा जिल्हाप्रमुख म्हणून काम करणारा रत्नाकर शिंदे तिथून पळून गेला. त्याचा आयफोन पोलिसांना सापडलेला असून त्याची स्कॉर्पिओ गाडी आणि इनोव्हा गाडी पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांना आढळली आहे .संबंधित कला केंद्र हा व्यक्ती पार्टनरशिपमध्ये चालवत असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे.
कला केंद्रात नृत्य करणाऱ्या एका मुलीकडे पोलिसांनी विचारपूस केली त्यावेळी तिने या कलाकेंद्रात आपले लैंगिक शोषण झालेले आहे अशी माहिती दिलेली आहे. पीडित मुलगी ही अल्पवयीन आणि अनुसूचित जाती जमातीची असून पोलिसांनी सर्व आरोपींच्या विरोधात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे आत्तापर्यंत आरोपींची संख्या 36 अशी असून काही आरोपी हे महालक्ष्मी कला केंद्र केज येथील आहेत तर इतर काही आरोपी ग्राहक म्हणून तिथे आलेले होते.