पुण्यात ज्वेलरी शोरूममध्ये तीन कोटींपेक्षा जास्तची महिलेची फसवणूक

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार नामांकित शोरूममध्ये समोर आलेला असून कमी किमतीचे हिरे दागिने जास्त किमतीला देऊन लोणी काळभोर तालुका हवेली येथील एका महिलेची तब्बल तीन कोटी 48 लाख रुपयांना फसवणूक करण्यात आलेली आहे. लक्ष्मी रोडवरील उंबऱ्या गणपती चौकात तनिष्क शोरूममध्ये ही घटना घडलेली आहे .

सदर प्रकरणी आत्तापर्यंत संगीता महाजन, तेजल पवार ,अमोल मोहिते ,सागर धोंडे ,चंदन गुप्ता ,धवल मेहता ,शोरूमचे मालक हितेश पूनामिया अशा एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून चेतन विसपुते नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. लोणी काळभोर येथील एका 46 वर्षीय महिलेने याप्रकरणी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिलेली आहे.

फिर्यादी महिला यांचे पेट्रोल पंप आणि इतर व्यवसाय आहेत आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांमधून त्यांनी डिसेंबर 2018 पासून लक्ष्मी रोडवरील शोरूममधून चार कोटी 19 लाख रुपयांचे हिऱ्याचे दागिने खरेदी केलेले होते. ग्राहक नेहमीचे असल्याकारणाने त्यांनी डिस्काउंट दिल्यानंतर मॅनेजर यांनी त्यांना डिस्काउंट देखील दिलेला होता.

जानेवारी 2023 मध्ये त्यांनी हिऱ्याचे दागिने बदलून दुसरे दागिने घेण्यासाठी त्या शोरूम मध्ये गेल्या त्यावेळी त्यांना वेगवेगळी कारणे देत दागिने न बदलण्यासाठी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी अनेकदा फोन केले मात्र शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही. सदर दागिने या महिला इतर शोरूममध्ये घेऊन गेल्या त्यावेळी त्यांच्याकडील हिऱ्याचे दागिने हे हलक्या दर्जाचे असल्याचे त्यांना सांगण्यात आले. कमी किमतीच्या हिऱ्याचे दागिने जास्त किमतीत देण्यात आले आणि जादा रकमेचे बनावट बिल तयार करून तनिष्कचे शिक्के मारून आपल्याला देण्यात आले याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.

महिलेच्या म्हणण्याप्रमाणे आरोपींनी आपल्याला चार कोटी एकोणीस लाख रुपयांचे दागिने वेळोवेळी बिले बनवून दिलेले असून प्रत्यक्षात त्याची किंमत अत्यंत कमी आहे. या सर्व फसवणुकीत तीन कोटी 48 लाख रुपयांचा रुपयांची आपली फसवणूक झालेली असून शोरूम मधील मॅनेजर , कॅशियर , बिजनेस मॅनेजर आणि मालक यांच्यासह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर मुख्य सेल्समन म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर या प्रकरणी तपास करत आहेत .


Spread the love