कॅन्सर झालेल्या पतीसाठी तिने जीवाचं रान केलं , पतीच्या डोक्यात वेगळंच भूत अन..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर इथे समोर आलेली असून रविवारी एका पतीने त्याच्या पत्नीची चारित्र्याच्या संशयावरून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना मोहील कॉलनीमध्ये घडलेली असून विशेष म्हणजे दोघांचाही प्रेमविवाह झालेला होता. पतीला कॅन्सर झाला असल्याकारणाने त्याच्यावर उपचारासाठी पत्नी जॉब करून जीवाचे रान करत होते मात्र या दोघांचाही अखेर अत्यंत दुर्दैवी शेवट झालेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सोनिया मंडले ( वय 37 ) असे मयत पत्नीचे नाव असून तिचा पती राजेश ( वय 45 ) हा गेल्या चार वर्षांपासून कॅन्सरने आजारी होता . तीन महिन्याच्या आधी ते या परिसरात राहायला आलेले होते. रविवारी सकाळी त्यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला आणि राजेश याने सोनिया हिच्या डोक्यात हातोड्याने वार करत तिची हत्या केली त्यानंतर त्याने स्वतः देखील सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली त्यावेळी त्यांची 14 वर्षांची मुलगी घरातील दुसऱ्या एका खोलीत झोपलेली होती. सकाळी ती उठली त्यावेळी तिला हा प्रकार दिसला आणि तिने शेजारच्या व्यक्तींना या प्रकरणी माहिती दिली आणि अवघ्या काही मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले.

सोनिया ही एका प्रयोगशाळेत काम करत असायची आणि पतीच्या उपचारासाठी तिने मुद्दाम नागपूर इथे बदली करून घेतलेली होती. पती राजेश अगोदर खदान परिसरात कामाला होता मात्र त्याला हृदयाचा त्रास झाल्याने त्याने काम सोडले. त्याला चार वर्षांपूर्वी त्याला तोंडाचा कॅन्सर झालेला होता त्यानंतर केमोथेरपी देखील सुरू होती मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती त्यामुळे तो घरीच बसून असायचा. सोनियावर त्याचे प्रेम जडले आणि त्यानंतर त्यांनी लग्न केलेले होते. राजेश याचे आधी एक लग्न झालेले होते मात्र सोनिया सोबत त्याचे प्रेम जडले आणि त्याने पहिली पत्नी सोडून सोनियासोबत लग्न केले. चार वर्षांपासून तो घरी असल्याने त्याच्याकडे काही काम नव्हते त्यातून सोनिया काम करत असल्याने त्याने तिच्यावर चारित्र्याचा संशय घेण्यास देखील सुरुवात केली होती.

सोनिया हिचा नववीत गेलेल्या मुलीवर खूप जीव होता आणि एका नामांकित शाळेत देखील त्यातील प्रवेश मिळाला होता. सर्व काही या कुटुंबात व्यवस्थित होते मात्र केवळ पत्नीवर संशय घेत असलेल्या पतीच्या वृत्तीमुळे भांडण झाले आणि त्यातून हा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. अवघ्या 14 वर्षांची मुलगी आता अनाथ झालेली असून तिच्या भवितव्याची चिंता तिच्या काही नातेवाईकांना सतावू लागलेली आहे.


Spread the love