लातूर हादरले..साईधन लॉजमध्ये मालकाची आत्महत्या तर एकाचा खून

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना लातूर इथे उघडकीस आली आहे. लातूरच्या साईधन लॉजमध्ये मालकाची आत्महत्या तर एकाचा खून झाल्याची घटना समोर आली आल्याने परिसरात खळबळ उडालेली असून अधिक तपास सुरु आहे .

उपलब्ध माहितीनुसार, उमेश रमेश देशमुख असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून साईधन लॉज मालक शिवाजी दगडू शिंदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लॉज चालवत असलेल्या शिवाजी शिंदे यांनी आत्महत्या करण्याआधी उमेश देशमुख याचा खून केला आणि नंतर तिसऱ्या मजल्यावर गळफास घेत आत्महत्या केली .

शिवाजी शिंदे यांची चुलत पुतणी ही उमेश देशमुख याची पत्नी आहे. उमेश देशमुख हा नेहमी आपल्या पत्नीला मारहाण करायचा त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला असण्याची शक्यता आहे तर धक्कादायक बाब म्हणजे दोघांनी एकत्र रात्री दारू प्यायली आणि त्याच नशेत हा खून झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

हे लॉज लातूर शहरातील साईनाका इथे आहे. या प्रकरणी विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मयत दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत


Spread the love