पुन्हा एक ‘ टास्क फ्रॉड ‘, महिलेला मीराचा फोन आला आणि म्हणाली..

Spread the love

महाराष्ट्रात सध्या फसवणुकीचे नवनवीन प्रकार रोज समोर येत असून पुण्यातील टास्क फ्रॉडचे लोन आता मुंबईत देखील पोहोचलेले आहे. एका महिलेला वर्क फ्रॉम होम सांगून ऑनलाईन पैसे लावल्यास चांगला फायदा होतो असे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी तिची सात लाख 95 हजार रुपयांना फसवणूक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , काशिमिरा परिसरातील जिगना मेहता नावाच्या महिला त्यांच्या वृद्ध आईसोबत राहतात. आईची देखभाल करण्यासाठी म्हणून घरी थांबावे लागत असल्याकारणाने त्यांनी जॉब सोडून दिलेला आहे आणि त्यानंतर त्या ऑनलाइन काहीतरी घरी काम मिळेल का याच्या शोधात होत्या. मीरा नावाच्या एका महिलेने त्यांना व्हाट्सअपवर कॉल करून गुगलवर वेगवेगळे हॉटेल्स आणि व्यावसाय यांना रिव्ह्यू देण्याचे काम तुम्ही कराल का ? असे विचारलेले होते आणि एका रिव्ह्यूसाठी तुम्हाला पन्नास रुपये देऊ असे सांगण्यात आले.

घरातूनच काम असल्याने जिग्ना यांनी यासाठी संमती दर्शवली आणि त्यानंतर कामाला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी सहाशे रुपये त्यांच्या बँक खात्यात आले त्यानंतर त्यांना टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यास सांगून आणखीन एका साईटवर जाऊन त्या ठिकाणी पैसे लावल्यास चांगला फायदा मिळेल असे सांगण्यात आलेले होते. सुरुवातीला त्यांनी दोन हजार रुपये भरले आणि त्यानंतर तात्काळ त्यांना 2800 रुपये आले त्यामुळे त्यांचा यावर विश्वास बसला.

फारसे काही कष्ट नाहीत आणि पैसे लावले की लगेच पैसे येतात त्यामुळे जिग्ना यांनी स्वतःकडील पैसे आणि मैत्रिणीकडून देखील काही पैसे घेऊन तिथे सुमारे सात लाख 95 हजार रुपये भरले त्यावेळी टेलिग्राम ग्रुप मध्ये चार जण होते आणि प्रत्येकाला होणारा नफा त्यात दाखवला जात होता. पैसे मागितल्यानंतर तुमचा स्कोर आता 70 आहे यावेळी तो 100 होईल त्यावेळी तुम्हाला पैसे मिळतील असे सांगण्यात आले आणि जिग्ना यांची अडवणूक सुरू झाली. जिगना यांनी त्यानंतर माहिती घेण्यास सुरुवात केली त्यावेळी अशाच पद्धतीने नागरिकांना फसवण्यात असल्याची अनेक प्रकरणी समोर आली. त्यात आपण देखील आहोत याची जाणीव झाल्यानंतर काशिमिरा पोलिसात त्यांनी गुन्हा दाखल केलेला असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे.


Spread the love