बायकोसोबत सासुरवाडीला आल्यानंतर एका व्यक्तीने स्वतःच्या अल्पवयीन मेहुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर तिला घेऊन त्याने पलायन केले . तब्बल एक महिना दोघे सोबत राहिले त्यावेळी त्याने तिला धमकावत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केले आणि पुन्हा सासुरवाडीला आल्यानंतर सासरच्या मंडळींनी दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील हे प्रकरण असून कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गावात ही घटना घडलेली आहे. पत्नीसोबत सासुरवाडीला आलेल्या भाऊजीने पत्नीला सोडून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार पोलिसात आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. २२ मे रोजी मेहुणीच्या आईने पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दिलेली होती. 21 वर्षीय तरुणाचा तीन वर्षांपूर्वी विवाह झालेला होता. तो अधूनमधून सासुरवाडीला येत असायचा याच दरम्यान त्याने पत्नीच्या अल्पवयीन बहिणीसोबत सूत जुळवले आणि काही दिवस ऊस तोडणीला गेल्यानंतर तो पुन्हा बायकोसोबत सासुरवाडीला आलेला होता.
दरम्यानच्या काळात हा व्यक्ती आणि त्याची मेहुणी यांच्यात प्रेमसंबंध सुरू झालेले होते आणि शारीरिक संबंध ठेवण्यास त्यांना अडचणी येत असायच्या. 22 मे रोजी आठवडी बाजाराच्या निमित्ताने आरोपी या तरुणीला तिच्या भावासह बाजार करायला घेऊन गेला मात्र मेव्हण्याला दुसरीकडे पाठवून दिले आणि मेहुणी सोबत तो पळून गेला. दुचाकीने तो सातारा येथे आला आणि सातारा इथे तो काही दिवस राहिला आणि दोन जुलै रोजी कन्नड तालुक्यातील पुन्हा तिला घेऊन आला.
नातेवाईकांना या प्रकरणी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ ते दोघे जिथे राहत आहेत तिथे धाव घेतली आणि या पीडित अल्पवयीन मुलीला कन्नड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून भाऊजीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.