मागासवर्गीय तरुणाला चप्पल चाटायला लावली , भाजपशासित राज्यातील प्रकार

Spread the love

कायदा सुव्यवस्थेचे डांगोरे कितीही पिटले जात असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र समोर येत असून उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे मागासवर्गीय तरुणाला बेदम मारहाण करून चक्क त्याला चप्पल चाटायला लावण्याचा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. वीज विभागातील एका कंत्राटी कामगाराला याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित तरुण हा मामाच्या गावाला गेलेला होता त्यावेळी वीजपुरवठा खंडित झाला म्हणून त्याने वीजयंत्रनेत कुठे त्रुटी आहे का ? हे पाहण्यास सुरुवात केली होती त्यावेळी वीज विभागातील कंत्राटी कामगार म्हणून काम करणारा तेचबालीसिंह पटेल याने त्याला बेदम मारहाण केली आणि जातिवाचक शिवीगाळ देखील केली. आरोपीने त्यानंतर चक्क त्याला चप्पलदेखील चाटायला लावली . सदर प्रकरणात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उत्तर प्रदेशातील महासंचालक कार्यालयाने देखील या प्रकरणाची दखल घेतलेली असून आरोपीला बडतर्फ करण्यात आलेले आहे. आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी या प्रकरणावरून भाजपवर टीका केली असून भाजपशासित राज्यात दलितांना माणूस म्हणून वागवण्यात येत नाही आणि तुम्ही समान नागरी कायद्यावर चर्चा तरी कशी करू शकता ? असा प्रश्न उपस्थित विचारलेला आहे.


Spread the love