बायकोला बुडवून मारलं पण विहिरीत स्वतःही झाला गायब अन..

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला परिसरात समोर आलेली असून दारू पिलेल्या पतीने किरकोळ कारणातून पत्नीला मारहाण केली आणि त्यानंतर तुला आज जिवंतच ठेवत नाही असे म्हणत दारूच्या नशेत विहिरीत ढकलून दिले त्यात तिचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर त्याच दरम्यान तिला बुडवण्यासाठी त्याने स्वतःही उडी घेतली आणि त्याचाही यात जीव गेलेला आहे. 13 जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास सांगोला तालुक्यातील घेरडी मेटकरवाडी येथील ही घटना आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सिद्धाराम सुभाष कारंडे ( वय 28 ) आणि सोनाली सिद्धाराम कारंडे ( वय 25 दोघेही राहणार मेटकरवाडी घेरडी ) अशी पती-पत्नींची नावे आहेत. मयत असलेला सिद्धाराम याच्या विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे.

13 जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास सोनाली आणि सिद्धाराम हे शेताकडे गेलेले होते त्यावेळी सिद्धाराम याने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केलेले होते आणि पत्नीसोबत तो वाद घालत होता. त्यांच्यातील वाद वाढत असल्याचे पाहिल्यानंतर परिसरातील रहिवासी लक्ष्मण आलदर यांनी काही अघटीत काही घडू नये या शक्यतेने त्यांचा पाठलाग केलेला होता.

शेतातील विहिरीजवळ सिद्धाराम यांनी सोनाली हिला मारहाण सुरू केली आणि त्यानंतर तिला विहिरीत ढकलून दिले त्यानंतर लक्ष्मण यांनी देखील विहिरीत उडी घेतली आणि सोनाली हिला वाचवत विहिरीच्या कडेला लिंबाच्या झाडाला धरून बाहेर काढले दरम्यानच्या काळात सिद्धाराम याने देखील विहिरीत उडी घेतली आणि तिचा पाय ओढत तिला पाण्यात बुडवले. सिद्धाराम स्वतः देखील पाण्यात बुडाला त्यानंतर दोघांचाही या घटनेत मृत्यू झालेला असून त्यांच्या तीन मुली यामुळे पोरक्या झालेल्या आहेत .


Spread the love