महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना भंडारा जिल्ह्यात समोर आलेली असून आपले आई-वडील डान्स क्लास लावण्यास नकार देत असल्याने संतापाच्या भरात बाहेर पडलेल्या एका अल्पवयीन मुलीला बसस्थानकावर गाठून पाच नराधमांनी फुस लावून पळून नेले आणि त्यानंतर दोन दिवस तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. आरोपींच्या विरोधात कलम 376 आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे.
सदर घटना ही 27 जून रोजी घडलेली असून अल्पवयीन मुलगी ही भीतीच्या सावटाखाली असल्याने गुन्हा 13 जुलै रोजी नोंदवण्यात आलेला आहे. आई वडील आपल्याला डान्स क्लास लावू देत नाहीत म्हणून संतापाच्या भरात ही मुलगी भंडारा बसस्थानकावर येऊन बसलेली होती त्यावेळी दोन तरुणांनी तिच्याकडे विचारपूस केली आणि तिला घरी घेऊन गेले. तिथे डांबून ठेवत तिच्यावर पाच जणांनी वेळोवेळी अत्याचार केले.
तिच्यावर अनेकदा अत्याचार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 28 तारखेला सकाळी सात वाजता दोन्ही आरोपींनी तिला बस स्थानकावर पुन्हा सोडून दिले त्यानंतर दोन आरोपी पुन्हा तिच्याकडे आले आणि त्यांनी ‘ जेवण कर भूक लागली असेल ‘ असे सांगून तिला पुन्हा मित्राच्या रूमवर नेले आणि जेवण झाल्यावर पुन्हा तिच्यावर अत्याचार केला आणि संध्याकाळी अखेर तिला बसस्थानकावर सोडून दिले. पीडित मुलगी ही दहशतीच्या वातावरणात असल्याकारणाने घाबरून गेलेली होती म्हणून गुन्हा उशिरा नोंदवण्यात आलेला आहे.