महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना लातूर शहरात समोर आलेली असून शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरात एका आंटीने आणि तिच्या साथीदाराने आर्थिक फायद्यासाठी महिलांना बोलावून सुरू केलेल्या कुंटण खाण्यावर पोलिसांनी अखेर छापा टाकला आहे त्यामध्ये या आंटीला आणि एका दलालला अटक करण्यात आली तर तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.
उपलब्ध माहितीनुसार, लातूर मधील एका उपनगरातील एक महिला आणि तिचा साथीदार असलेला एक दलाल यांनी राहत्या घरातच आर्थिक फायद्यासाठी घरगुती स्वरूपाचा कुंटणखाना सुरू केलेला होता त्यामध्ये परिसरातील पीडित महिलांना हेरून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले जात होते.
सदर प्रकाराची माहिती गुप्त सूत्रांच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याच्या उद्देशाने बनावट ग्राहक तिथे पाठवलेले होते त्यावेळी देहविक्रय करणाऱ्या तीन महिला आणि व्यवसाय करून घेणारी एक महिला सोबतच तिचा दलाल हे होते. बनावट ग्राहकाने इशारा केल्यानंतर अखेर कारवाई करण्यात आली आणि तीन महिलांची सुटका करण्यात आली सोबतच 14 हजार 44 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.