महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सणसवाडी इथे समोर आलेली असून पत्नी आणि मेव्हण्याने शरद चिंग्या काळे नावाच्या एका इसमाचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केलेला आहे त्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह डोंगराच्या झाडी फेकून दिलेला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन इथे याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सुनिता उर्फ पिंका शरद काळे आणि मेहुना जिगऱ्या सुरेश भोसले अशी आरोपी व्यक्तींची नावे असून मयत शरद काळे हा सतत दारू पिऊन पत्नीला मारहाण करत असायचा त्यामुळे संतप्त झालेली पत्नी आणि तिच्या भावाने अर्थात मयत व्यक्तीच्या मेव्हण्याने त्याला बेदम मारहाण केली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.
आपल्याकडून नवऱ्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींनी शरद याचा मृतदेह डोंगरात नेऊन टाकला त्यानंतर त्याचा खून झाल्याची फिर्याद त्याची पत्नी संगीता हिने शिक्रापूर पोलिसात दिली. पोलिसांनी तात्काळ शरद याची पत्नी सुनीता आणि मेहुना जिगरिया यांना अटक केली असून त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती आहे.