देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात गेल्या काही वर्षात वाढ झालेली पहायला मिळते आहे. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली असणं दोन मुस्लिम बहिणींवर आरोपीने ऍसिड फेकले आणि तो तिथून पळून गेला. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात ही घटना घडलेली आहे . मोठ्या बहिणीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले असून पळून गेलेल्या आरोपीला धरण्यात आले आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलैनी पोलिस स्टेशन हद्दीतील रोशनगड गावात मंगळवारी सकाळी गावातील एका तरुणाने दोन मुस्लिम बहिणींवर ॲसिड फेकले. आरोपी तरुण अनेक दिवसांपासून मुलींची छेड काढत होता मात्र त्या त्याच्याकडे लक्ष देत नसल्याने नराधमाने हा अघोरी प्रकार केला.मंगळवारी घराबाहेर पडलेल्या बहिणींवर ॲसिड टाकून तरुण फरार झाला. दोन्ही बहिणींवर ॲसिड टाकल्यानंतर मोठ्या बहिणीची प्रकृती चिंताजनक आहे. उपचारासाठी पिलाना सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोन्ही बहिणींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कायदा सुव्यवस्था असल्याचे कितीही दावे सरकारकडून करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती अवघड आहे . अत्यंत घातक असे ॲसिड मिळवणे देखील उत्तर प्रदेशात कठीण नाही. भाज्यांप्रमाणेच काही लोक त्याचा व्यवसाय चक्क सायकली आणि गाड्यांवर फिरून विकून करतात. २० रुपये लिटर दराने गावागावात पुरवठा केला जातो. विक्रेत्या तरुणाने सांगितले की, या ॲसिडचा वापर टॉयलेट साफ करण्यासाठी केला जातो. कमी किमतीमुळे गावकरी सहज खरेदी करतात.