प्रदीप कुरुलकर याचा आणखी एक कारनामा आला समोर , ती पुढे आली तर ..

Spread the love

पुणे येथील डीआरडीओ प्रकरणात मुख्य आरोपी असलेला संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर याच्या अडचणी वाढत असून पाकिस्तानी हेर म्हणून काम करणारी झारा दासगुप्ता हिच्या सोबत त्याने ‘ बेब ‘ नावाने चॅटिंग केलेली आहे. एका महिलेशी त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा देखील प्रकार आतापर्यंत समोर आलेला असून त्यांच्यातील चॅटिंग तपास यंत्रणेला मिळालेली आहे. एटीएसने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात हे सर्व नमूद करण्यात आलेले आहे. प्रदीप कुरुलकर याच्या विरोधात संबंधित महिलेने अद्यापपर्यंत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही मात्र तिने तक्रार दाखल केली तर कुरुलकर याच्या अडचणीत वाढ होणार आहे.

डॉक्टर प्रदीप कुरुलकर याला दोन महिन्यांपूर्वी डीआरडीओ अर्थात संरक्षण क्षेत्रासंदर्भात असलेली गोपनीय माहिती एका पाकिस्तानी एजंट असलेल्या महिलेसोबत हनीट्रॅप झाल्यानंतर शेअर केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर देशात एकच खळबळ उडाली होती. न्यायालयात त्याच्याविरोधात तब्बल 2000 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे.

पाकिस्तानी हेर म्हणून काम करणारी झारा दासगुप्ता हिला ब्राह्मोस , अग्नि , सरफेस टू एअर मिसाईल या संदर्भात चॅटिंगद्वारे माहिती पुरवल्याचे समोर आल्यानंतर त्याचे एका महिलेसोबत विवाहसंबंध असल्याचा देखील प्रकार समोर आलेला आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात तब्बल 70 पेक्षा अधिक जणांचे जबाब नोंदवून गोपनीय कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आलेली आहेत.


Spread the love