व्यावसायिक वादातून सीएने दिली मित्राची सुपारी , पुण्यात प्रकरण उघडकीस

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक खळबळजनक असा प्रकार पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त हद्दीत समोर आलेला असून एका चार्टर्ड अकाउंटंटने त्याचा व्यावसायिक भागीदार असलेल्या मित्राचा खून करण्यासाठी 50 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे प्रकरण समोर आलेले आहे.

पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने सीए म्हणून काम करणारा विवेक नंदकिशोर लाहोटी आणि रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार सुधीर अनिल परदेशी याच्यासोबत एका महिलेला देखील अटक केलेली आहे. दोन्ही आरोपींच्या ताब्यातून दोन देशी पिस्तुले आणि 24 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेली आहेत.

सीए म्हणून काम करणारा विवेक नंदकिशोर लाहोटी याचा व्यावसायिक भागीदार असलेला राजू माळी याचा खून करण्यासाठी विवेक नंदकिशोर लाहोटी याने आपल्या जवळच्या एका मैत्रिणीच्या मदतीने रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला सुधीर अनिल परदेशी आणि शरद साळवी याला 50 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे आत्तापर्यंत तपासात आलेले आहे.

सीए असलेला विवेक लाहोटी याचा राजू माळी यांच्यासोबत जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसायातून उद्भवलेल्या वादातून सीए म्हणून काम करणारा विवेक नंदकिशोर लाहोटी याने राजू माळी याचा सुपारी देऊन खून करण्याचा कट रचला होता असे आत्तापर्यंत तपासात समोर आलेले आहे.


Spread the love