राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सध्या कोण कोणाच्या पाठीमागे आहे याचा एकच गोंधळ राज्यात उडालेला असून मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरची 602 नंबरची केबिन सध्या चांगलीच चर्चेत आलेली आहे. सदर केबिन घेण्यास बहुतेक मंत्री नकार देतात कारण ही केबिन शापित असल्याची अनेक आमदारांची धारणा झालेली आहे. आत्तापर्यंत ही केबिन ज्या मंत्र्यांना मिळाली त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागलेले आहे त्यामुळे सहसा ही केबिन घेण्यास सर्वांचाच नकार असतो.
अजित पवार हे सध्या भाजप शिवसेनेसोबत हात मिळवणी करत आणि राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत दाखल झालेले आहेत त्यामुळे त्यांनी देखील सहाशे दोन नंबरची केबिन घेण्यास नकार दिलेला असल्याचे वृत्त दैनिक दिव्य मराठी यांनी दिलेले आहे. अजित पवार यांनी ही केबिन घेण्यास नकार दिल्यानंतर सचिवांचा कक्ष रिकामा करण्यात येऊन तो त्यांना देण्यात आलेला आहे.