राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या पुणे येथील कार्यालयावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केलेला असून सुदैवाने यात कोणी जखमी झालेले नाही. रोहित पवार यांचे पुण्यातील हडपसर इथे कार्यालय असून 13 जुलै रोजी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास दोन ते तीन अज्ञात व्यक्तींनी पांढऱ्या रंगाच्या चार चाकी गाडीत येऊन कार्यालयावर हल्ला करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना अपयश आलेले आहे . कार्यालयात खाली असलेल्या काही वस्तूंच्या आणि उभ्या वाहनांचे नुकसान झालेले असून रोहित पवार अज्ञात व्यक्तींच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे.
महाराष्ट्रातील राजकारणात राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि राष्ट्रवादीचाच अजित पवार गट असे दोन गट पडलेले आहेत. रोहित पवार हे पहिल्या दिवसापासून शरद पवार यांच्यासोबत असून सोशल मीडियावर त्यांनी फुटलेल्या माजी सहकाऱ्यांना काही गंभीर प्रश्न ट्विटरवरून विचारलेले आहेत त्यावरून नवीन राष्ट्रवादीचे नेते आणि जुने राष्ट्रवादीचे नेते यात वाद सुरू झालेला आहे.
रोहित पवार हे सातत्याने शरद पवार यांच्याच शैलीत संयमी भाषेत उत्तर आणि प्रत्युत्तर देत असतात. वेगवेगळ्या विषयावरती आपले परखड मत सातत्याने मांडत असल्याने राज्यभरात अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्यामध्ये भावी शरद पवार आम्हाला दिसतात अशा देखील भावना आहेत. हल्ला झाला त्यावेळी रोहित पवार हे मुंबई इथे होते त्यानंतर कर्जत जामखेड मतदार संघात एकच खळबळ उडाली असून हे अज्ञात व्यक्ती कोण आहेत याचा शोध घेण्याची मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे.