पीएसआय बनून बोलायचा अन हवालदार म्हणून जायचा , फसवणुकीचा अजब फंडा समोर

Spread the love

एक अजब प्रकार सध्या छत्रपती संभाजीनगर इथे समोर आलेला असून मी एमआयडीसी वाळूज येथील पीएसआय बोलत आहे असे सांगत बीए झालेल्या एका बेरोजगार व्यक्तीने तब्बल सात हार्डवेअर व्यावसायिकांना महिन्याभरात अडीच लाख रुपयांना चुना लावलेला आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी अखेर त्याला अटक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , ज्ञानेश्वर नारायण देशमुख ( वय 36 राहणार पुंडलिकनगर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून परिसरातील व्यावसायिक असलेले सचिन काळे यांना 3 जुलै रोजी एका अनोळखी नंबरवरून फोन आलेला होता त्यावेळी त्याने आपण एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अधिकारी आहोत . आपल्याला इन्व्हर्टर बॅटरी हवी आहे असे सांगितले. माणसाला वस्तू घेऊन येण्यासाठी फोन पेवर पैसे पाठवतो असा देखील विश्वास दिला म्हणून काळे यांनी बॅटरी दिली मात्र त्यानंतर त्याने प्रतिसाद देणे बंद केले.

दरम्यानच्या काळात शहरातील सिटी चौक , सिडको , सातारा परिसरात अशाच पद्धतीने अनेक इलेक्ट्रिक , हार्डवेअर , कलरची दुकाने , प्लंबिंग साहित्य अशा व्यवसायिकांना याच पद्धतीने फसवल्याच्या घटना समोर आल्याच्या अनेक तक्रारी पुंडलिकनगरच्या निरीक्षक राजश्री आडे यांच्यापर्यंत येऊन पोहोचलेल्या होत्या त्यानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वी याप्रकरणी एक महत्त्वाची टीप मिळाली.


Spread the love