पुण्यात एक अजब असा प्रकार समोर आलेला असून आत्तापर्यंत भाड्याने दिलेल्या गाड्या गायब होण्याचे प्रकार समोरआलेले असताना चक्क जेसीबी भाड्याने घेऊन तोच गायब करण्याचा प्रकार समोर आलेला आहे. दरमहा भाड्याने जेसिबी नेतो असे सांगत एक व्यक्ती जेसीबी घेऊन गेलेला होता त्यानंतर जेसीबीचे सव्वाचार लाख रुपये भाडे दिले नाही आणि जेसीबी गायब करून टाकला.
उपलब्ध माहितीनुसार, योगेंद्र उदागे ( वय 32 राहणार सुसरे ) असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून माऊली किसन जाधव ( वय 51 राहणार जाधववाडी चिखली ) यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिलेली आहे. आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून जेसीबी दरमहा 70 हजार रुपये भाड्याने नेलेला होता त्यानंतर जेसीबीला लावलेली जीपीएस यंत्रणा त्याने बंद केली आणि भाडे देखील दिले नाही आणि स्वतःचा मोबाईल फोन बंद केला . जेसीबी देखील त्याने गायब केला अशी तक्रार पोलिसात देण्यात आलेली असून पोलिसांनी प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केलेली आहे .