शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आलेला आहे . 16 तारखेला रविवारी हडपसर परिसरात ही घटना घडलेली असून घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झालेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सुशांत बाळासाहेब चव्हाण ( वय 26 राहणार हडपसर ) असे जखमी व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी अमोल संदिपान गायकवाड ( वय 34 राहणार पांढरेवाडी तालुका भूम जिल्हा धाराशिव ) आणि मयूर किसान चव्हाण यांना अटक करण्यात आलेली आहे.
दोन्ही आरोपी हे भूम तालुक्यातील पांढरेवाडी येथील असून या आरोपींपैकी एका व्यक्तीच्या पत्नीचे सुशांत याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोपींना संशय होता . दीड वर्षांपूर्वी आरोपी सुशांत आणि आरोपीची पत्नी पुण्यात पळूनही आलेले होते. दोघे हडपसर परिसरात काही काळ वास्तव्याला देखील राहिले . सुशांत हा व्हिडिओ पार्लरमध्ये काम करत असल्याची माहिती आरोपींना मिळालेली होती त्यामुळे त्यांनी हडपसर इथे जाऊन त्याच्यावर हल्ला केला त्यात तो गंभीर जखमी झालेला आहे.