पुण्यातील पिंपरी इथे एक अजब प्रकार समोर आलेला असून भाईगिरीचा नवीन पॅटर्न एका दुकानदाराला अनुभवावा लागलेला आहे. फुकट मसाला दूध दिले नाही म्हणून एका तरुणाने कोयत्याने दुकानातील सामानाची आणि वस्तूंची तोडफोड केली आणि दुकानदाराकडे पाच हजार रुपयांची खंडणी मागितली असे प्रकरण समोर आलेले आहे.
15 जुलै रोजी ही घटना घडलेली असून आळंदी येथील देहूफाटा परिसरात पृथ्वीराज शिवाजी पारधे ( वय 27 राहणार भोसरी ) हा अनिकेत मेटकर ( वय 20 राहणार दिघी ) यांच्या दुकानात आलेला होता. फिर्यादी यांची देहूफाटा येथे संतकृपा मसाला दूध कॉर्नर नावाने गाडी आहे. तिथे आल्यानंतर आरोपीने फुकट दूध मागितले ते त्याला देण्यात आले नाही म्हणून त्याने तोडफोड केली असे त्यांनी फिर्यादीत म्हटलेले आहे.