महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी इथे समोर आलेला असून एका नामांकित शाळेत शिक्षक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीचे चक्क तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत संबंध असल्याचे समोर आलेले असून मुलीच्या आईने या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , अवेज शेख ( वय 25 राहणार आंबेडकर वार्ड ) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून त्याला तात्काळ पोलिसांनी अटक केलेली आहे. तो शिकवत असलेल्या एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत त्याचे प्रेमप्रकरण सुरू झालेले होते.
मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार , आरोपी हा मुलीला व्हाट्सअप आणि स्नॅपचॅट च्या माध्यमातून तिच्यासोबत संपर्कात राहायचा. 19 जुलै रोजी रात्री दीड वाजता आरोपी पीडित मुलीच्या घरी गेलेला होता ही बाब मुलीच्या आईच्या लक्षात आली आणि तिने तिला पाहिल्यानंतर आरोपी तिथून पळून गेलेला होता . पोलिसांनी आरोपीवर विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल केलेले असून त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे.