सोशल मीडियावर सध्या एका तरुणाची जोरदार चर्चा सुरू असून कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांकडे असली तरी एका व्यक्तीने चक्क आपला बूट चोरीला गेला म्हणून पोलिसांच्या 112 नंबरवर फोन करून तक्रार दिलेली आहे. कर्नाटकच्या मंगळूर येथील हे प्रकरण असून पोलिसांनी देखील तात्काळ तिथे जाऊन त्याचे म्हणणे ऐकून घेतलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , एक तरुण मंगळूर येथील एका मंदिरात रविवारी गेलेला होता. मंदिरात जातेवेळी त्याने पायातील बूट बाहेर काढून ठेवले मात्र मंदिरातून बाहेर आल्यावर त्याचे बूट तिथे आढळून आले नाहीत त्यानंतर तात्काळ त्याने 112 नंबरवर फोन केला त्यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले मात्र बूट चोरीला गेलेला आहे हे ऐकल्यानंतर पोलिसांनी कपाळाला हात लावला.
सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एक व्यक्ती बूट घेऊन जाताना दिसून आलेला असून पोलिसांनी बूट चोरणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू केलेला आहे. सोशल मीडियावर या व्यक्तीने त्याची पोस्ट शेअर केली त्यानंतर त्याच्या या पोस्टवर वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेक जणांनी त्याचे कौतुकही केलेले आहे तर काही जणांनी इतक्या किरकोळ विषयात पोलिसांनी लक्ष घालावे म्हणून मागणी केली यावर टीका देखील केलेली आहे.