‘ उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांनो तुम्ही संभाजीनगर म्हणाच, न्यायालयातच उभा करतो ‘ सदावर्तेंनी ठणकावलं

Spread the love

औरंगाबाद शहराचे नामकरण हा राज्यात एक मुद्दा बनलेला असून सतत शिवसेना नेत्याकडून औरंगाबादचा उल्लेख हा संभाजीनगर असा करण्यात येतो. शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं एकेरी नाव घेण्यावरुन अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ शिवसेना नेते दिवाकर रावते यांना इशारा दिला असून पुढील काळात छत्रपती संभाजी नगर म्हणालात तर ठीक अन्यथा तुम्हाला न्यायालयातच उभा करतो, असं जाहीर आव्हानच गुणरत्न सदावर्ते यांनी शिवसेनेला दिलं आहे.

काय म्हणाले अॅड गुणरत्न सदावर्ते ?

शिवसेना नेत्यांनो, यापुढे छत्रपती संभाजी नगर म्हणाले तर ठीक अन्यथा तुम्हाला न्यायालयात उभा केलं जाईल. त्यामुळे महापुरुषांच्या नावाने शहर असलेल्या नावांचा उच्चार करताना एकरी न करता आदरपूर्वक करावा. अशोक चव्हाण यापुढे एकरी नावाने शिवाजीनगर म्हणलेलं चालणार नाही. शिवसेना नेते सातत्याने औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं घेत असतात. एकतर एकेरी नाव घ्यायचं नाही. यापुढे एकेरी नाव घेतलं तर न्यायालयात उत्तर द्यायला तयार रहा.

अॅड गुणरत्न सदावर्ते औरंगाबादेत आले होते त्यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तसंच एसटी विलिनिकरण, म्हाडा पेपरफुटी अशा विविध विषयांवर आपली मतं मांडली.एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण रोखण्यासाठी फक्त शरद पवार जबाबदार आहेत, अशी टीकाही सदावर्ते यांनी केली अन सोबतच म्हाडा पेपरफुटी प्रकरणी तपास औरंगाबाद पोलिसांनी करायला पाहिजे, मात्र तपास पुणे पोलिस करत आहेत यात कुणाचा इंट्रेस आहे, असं म्हणत त्यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे तसेच पेपरफुटीप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचे नाव आरोपींच्या यादीत टाकावे, अन्यथा पुरावे नष्ट होतील, असा दावाही सदावर्ते यांनी केला.


Spread the love