आधी तिच्या बहिणीला फोटो पाठवले अन.., वडगाव शेरी येथील घटना

Spread the love

एक खळबळजनक अशी घटना पुण्यात समोर आलेली असून ‘ जर माझ्यासोबत लग्न केले नाही तर तुझे फोटो व्हायरल करेल ‘ अशी धमकी देत दोघांचे फोटो कुटुंबीयांना पाठवून बदनामी केल्याचा प्रकार पुण्यातील वडगाव शेरी परिसरात समोर आलेला आहे. पीडित महिलेसोबत आरोपीचे पूर्वी प्रेमसंबंध होते त्यातून त्याने हा प्रकार केलेला आहे.

एका 27 वर्षीय महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी धवल धीरज उपाध्याय ( वय 24 राहणार चंद्रपूर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याचे पीडित महिलेसोबत पूर्वी प्रेमसंबंध होते आणि तो तिला माझ्यासोबत लग्न कर असा सतत तगादा करत होता. महिलेने त्याला वेळोवेळी समजावले होते मात्र तरीदेखील त्याच्या वर्तनात बदल होत नव्हता.

धक्कादायक बाब म्हणजे पीडित 27 वर्षीय महिला विवाहित असून धवल धीरज उपाध्याय हा तिच्याकडे लग्नाचा तगादा करत होता. महिलेच्या नातेवाईकांना त्याने तिच्यासोबतचे काही फोटो पाठवून दिले. सुरुवातीला त्याने तिचे आणि त्याचे एकत्रित फोटो पीडित महिलेच्या बहिणीला पाठवले आणि त्यानंतर तिचा पती आणि तिच्या वडिलांना फोन करून धमकी देखील दिली. सोशल मीडियात देखील त्याने हे फोटो अपलोड केले. चंदननगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस निरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत.


Spread the love