काही दिवसांपूर्वी बुलढाणा येथील राजुर घाटात 35 वर्षीय महिलेवर आठ जणांनी बलात्कार केल्याचा गुन्हा बोराखेडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला होता. स्वतः आमदार संजय गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून गुन्हा दाखल करून घेतला. संपूर्ण राज्यात यामुळे संतापाची लाट पसरली मात्र या प्रकरणाने वेगळेच वळण घेतलेले असून पीडित महिलेने तिच्यासोबत कोणताही लैंगिक अत्याचार झाला नाही असे पोलीस जबाबात म्हटलेले आहे.
पोलीस जबाबामध्ये महिलेने , आरोपींनी आम्हाला फक्त मारहाण केली आणि आमच्याकडील पैसे आणि मोबाईल काढून नेला. आमचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची तसेच समाजात बदनामी करण्याची धमकी दिली त्यानंतर आरोपी निघून गेले. आपल्यावर कुठलाही लैंगिक अत्याचार झालेला नाही त्यामुळे माझ्या वैद्यकीय तपासणीची गरज नाही ‘, असे तिने लिहून दिलेले आहे. न्यायालयात देखील तिने अशाच स्वरूपाचा जबाब दिलेला असून तिने हा जबाब कुणाच्या दबावावरून दिला का याचाही सध्या तपास सुरू आहे.
पीडित महिला आणि तिच्यासोबत असलेला एक नातेवाईक हे राजुर घाटात सेल्फी काढण्यासाठी थांबलेले होते त्यावेळी आठ जण तिथे आले आणि त्यांना मारहाण करत त्यांच्याजवळील 45000 रुपये चाकूचा धाक दाखवत लुटले आणि मोबाईल देखील हिसकावून नेला सोबतच तेथील एका दरीत नेऊन महिलेवर सामूहिक अत्याचार केला असे आत्तापर्यंतच्या माहितीत समोर आलेले होते मात्र महिलेनेच आता असा प्रकार झाला नसल्याचे म्हटल्यानंतर प्रकरणाला वेगळेच वळण लागलेले आहे.