महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव तालुक्यात समोर आलेली असून गोंदेगाव येथील तीन मुलांची आई असलेली सत्तावीस वर्षीय महिला गावातील एका तरुणासोबत पळून गेलेली आहे. आरोपी तरुणाचे वय 25 वर्षे असून सदर महिला आणि आरोपी हे वेगळ्या धर्माचे असल्याकारणाने आरोपीने तिला फूस लावून पळवून तिचे धर्मांतर करण्याची शक्यता महिलेच्या पतीने आणि गावकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सलमान शेख शकील ( वय 25 वर्ष ) असे आरोपी तरुणाचे नाव असून सदर घटनेनंतर सोयगाव पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास तात्काळ करावा आणि गावात जातीय तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी महिलेच्या पतीने आणि संपूर्ण गावकऱ्यांनी केलेली आहे. सदर घटनेनंतर गावात एक दिवस बंद देखील पाळण्यात आलेला होता.
सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव इथे तीन मुलांच्या आईला या तरुणाने फूस लावून पळून गेलेले आहे. महिलेच्या पतीने माध्यमांशी बोलताना माझ्या पत्नीचे अपहरण करणाऱ्या तरुणासह त्याच्या कुटुंबाचा शोध घेऊन गुन्हा दाखल करा अन्यथा संपूर्ण गाव बंद करण्यात येईल असे म्हटलेले होते. त्याच्या या हाकेला गावकऱ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन संपूर्ण गाव एक दिवस बंद ठेवलेले होते.
पोलिसांनी सदर महिला आणि आरोपी तरुण यांचा शोध सुरू केलेला असून अद्यापपर्यंत ते हाती आले नाहीत म्हणून अखेर महिलेच्या पतीने पोलिसात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिलेली आहे. आरोपीने आपल्या पत्नीला कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेलेले आहे असा आरोप पतीने केलेला असून आरोपी तरुण हा तिच्यापेक्षा तब्बल दहा वर्षांनी लहान आहे. आपल्या पत्नीचा घातपात होण्याची देखील शक्यता आहे असे देखील या पतीने म्हटलेले आहे.