महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार हिंगोली जिल्ह्यात गोरेगाव इथे समोर आलेला असून पत्नीने गावातील एका तरुणासोबत अनैतिक संबंध स्थापन केले आणि त्यानंतर पत्नी आणि तिचा प्रियकर यांनी दिलेल्या मानसिक त्रासाला वैतागून अखेर एका पतीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केलेली आहे . सेनगाव तालुक्यातील वायचळ पिंपरी येथील ही घटना आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अमोल काशीराम वायचाळ ( वय 27 राहणार पिंपरी ) असे मयत व्यक्तीचे नाव असून त्याची पत्नी हिचे गावातील अविनाश उत्तमराव वायचाळ नावाच्या एका तरुणासोबत गेल्या दोन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. महिलेच्या पतीने अनेकदा पत्नीला याबद्दल समजावून सांगितले मात्र तरीदेखील तिच्या वर्तनात बदल झाला नाही आणि दोघांनी गाव सोडून इतरत्र पलायन केले. पुन्हा गावात परतल्यानंतर पुन्हा एकदा समजावण्यात आले मात्र पुढील काळात आपल्याला असा त्रास दिला तर पतीच्याच विरोधात तक्रार करण्याची धमकी तिने दिली.
धक्कादायक बाब म्हणजे मयत व्यक्तीची पत्नी आणि प्रियकर यांनी सातत्याने अमोल याच्याकडे पाहत ‘ तुझ्याने काय झाले ‘ असे म्हटले त्यातून त्याला मानसिक त्रास झाला. आपल्या तीन महिन्याच्या मुलीचे आणि घरच्यांचे यापुढे कसे होईल या विचाराने अमोल हा अस्वस्थ झालेला होता त्यातून त्याने 20 ते 22 जुलैच्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेतला. त्यात त्याचा मृत्यू झालेला असून मयत व्यक्तीच्या भावाने त्याची पत्नी आणि प्रियकराच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून पोलीस उपनिरीक्षक संतोष आघाव पुढील तपास करत आहेत .