‘ ते बाळ माझं नाही ‘ , प्रसूतीनंतर भेटायला आला अन..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण परभणीत समोर आलेले असून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत जन्मदात्या पित्याने आपल्या चार दिवसाच्या मुलावर चाकूने वार केले . परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गुंडेवाडी येथील ही घटना असून आरोपी पतीच्या विरोधात पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , व्यंकटी कंकरे असे या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याची पत्नी असलेली कल्पना यांनी त्याच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे. लग्नानंतर प्रसूतीसाठी कल्पना या माहेरी आलेल्या होत्या त्यानंतर त्यांनी एका मुलाला जन्म देखील दिला. सदर मुलगा चार दिवसाचा झाल्यानंतर पती व्यंकटी राम कंकरे हा बायकोला भेटायला म्हणून सासुरवाडीला आलेला होता.पत्नी कल्पना बाळाला दूध पाजत असतानाच तुला झालेला मुलगा माझा नाही असे म्हणत आरोपीने त्यांना मारहाण करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मुलाच्या पोटावर देखील चाकूने वार केले.

चार दिवसाच्या मुलाच्या पोटावर चाकूने वार केल्यानंतर हा मुलगा गंभीर जखमी झालेला असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मुलाची आई असलेल्या कल्पना कंकर यांनी तात्काळ पोलिसात फिर्याद दिलेली असून पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे.पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश डोंगरे , पोलीस कर्मचारी शिवदास धुळगुंडे माणिक वाहक यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतलेले आहे.


Spread the love