महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली आहे. पुण्यातील आयटी कंपनीने कामावरती हजर झाले नसल्याचा कारणे दाखवाचा मेसेज केल्यानंतर नोकरी जाण्याच्या भितीने वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील संगणक अभियंत्याने तळ्यातील पाण्यामध्ये उडी मारुन आत्महत्या केली असून अभिषेक प्रभाकर सनगर ( वय २४, रा . पोस्ट कॉलनी, वालचंदनगर ) असे या युवकाचे नाव आहे .
उपलब्ध माहितीनुसार, अभिषेक सनगर हा पुण्यातील नामवंत आय.टी कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून कार्यरत होता मात्र कोरोनामुळे अभिषेक गेल्या सुमारे २० महिन्यापासून घरुन कंपनीचे वर्क फॉर्म होम अंतर्गत काम करीत होता. गेल्या दोन महिन्यापासुन संबधित कंपनीचे नियमित कामकाज सुरु झाले मात्र अभिषेक हा कामावर हजर झाला नसल्याने कंपनीने कंपनीमध्ये हजेरी का लावत नाही ? असे कारणे दाखवा बाबत मॅसेज केला होता. मेसेज आल्यानंतर तो नोकरी जाण्याच्या भीतीने घाबरून गेला होता.
१४ तारखेला मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास अचनाक घरातुन निघुन गेला आणि वालचंदनगरमधील तळ्यातील पाण्यामध्ये त्याने उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बनसोडे पुढील तपास करत आहेत.