‘ काय करायचे ते कर ‘ , लैंगिक अत्याचार करून त्याने दुसरीकडेच केले लग्न

Spread the love

पुण्यात फसवणुकीच्या घटना रोज समोर येत असून पुन्हा एकदा अशीच एक घटना पुण्यातील पिंपरी परिसरात समोर आलेली आहे. लग्न जुळवणाऱ्या एका वेबसाईटवर झालेल्या ओळखीनंतर महिलेचा विश्वास संपादन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार समोर आलेला असून आरोपीने त्यानंतर इतरत्र लग्न करून महिलेची फसवणूक केलेली आहे. 23 तारखेला हिंजवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अविनाश शिवाजी पाटील ( राहणार कोल्हापूर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून ऑक्टोबर 2021 पासून तर डिसेंबर 2021 पर्यंत हिंजवडी आणि वाशी परिसरात वेळोवेळी आरोपीने महिलेवर अत्याचार केलेले आहेत. एका वेबसाईटवर आरोपीसोबत फिर्यादी यांची ओळख झालेली होती त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत आरोपीने आपल्यावर अत्याचार केला असे पीडित महिलेचे म्हणणे आहे.

महिलेने पुढे म्हटले की , एकीकडे आपल्यासोबत प्रेमाचे नाटक आणि लग्नाचे आमिष दाखवत आरोपी शारीरिक संबंध ठेवत होता तर दुसरीकडे जुलै 2023 मध्ये त्याने दुसऱ्याच एका तरुणीशी लग्न केले आणि आपली फसवणूक केली. फिर्यादी यांनी जाब विचारला त्यावेळी त्याने तुला काय करायचे ते कर अशा स्वरूपात धमकी दिली आणि शिवीगाळ केली. हिंजवडी पोलीस या प्रकरणी तपास करत असल्याची माहिती आहे.


Spread the love