विकृतीचा कळस..वेडसर महिलेला घरी घेऊन आला अन..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नागपूर येथील कन्हान इथे समोर आलेली असून रस्त्यावर फिरत असलेल्या एका वेडसर महिलेच्या अगतिकतेचा फायदा घेत एका व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेले आहेत. सदर प्रकरणी एका विकृत व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अनिल हंडा ( राहणार विवेकानंद नगर कन्हान तालुका पारशिवनी ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून 35 ते 40 वर्षे वयोगटातील एक वेडसर महिला रोडवर फिरत असते . परिसरातील नागरिक जे काही देतील ते खाऊन ती स्वतःची गुजराण करते आणि तिला वाटेल तिथे रात्री मुक्काम करते .

आरोपी अनिल हा विवाहित असून पत्नीच्या निधनानंतर एकटाच राहतो. बुधवारी एकोणीस तारखेला रात्री आठच्या सुमारास त्याने या महिलेला घरी नेले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला . सदर प्रकाराची माहिती त्याच्या शेजारी राहणाऱ्या काही नागरिकांना मिळाली आणि त्यांनी तात्काळ त्याच्या घरी जाऊन पाहणी केली आणि पोलिसांना माहिती दिली.

पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी अनिल याला आवाज दिला आणि अनिलने दरवाजा उघडला त्यावेळी आतमध्ये ही महिला अर्धनग्न अवस्थेत आढळून आली . कन्हान पोलिसांनी आरोपीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला असून महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे आणि तिला शासकीय मनोरुग्णालयात भरती करण्यात आलेले आहे.


Spread the love