महाराष्ट्रात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना नेरूळ सेक्टर 27 इथे समोर आलेले असून साईकृपा सोसायटीत एका नवविवाहित महिलेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती याप्रकरणी तिच्या पती आणि सासूच्या विरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आपल्या मृत्यूनंतर आपले बोलणे कुणापर्यंतच पोहोचणार नाही याची शक्यता असल्या कारणाने मयत नवविवाहितेने चक्क अंतर्वस्र्त सुसाईड नोट लपवलेली होती.
उपलब्ध माहितीनुसार , मयत तरुणी हिचे लग्न शशी बामणे नावाच्या एका तरुणासोबत तीन जून रोजी झालेले होते. लग्नानंतर काही दिवसातच तिचा पती शशी आणि सासू शकुन यांच्याकडून कार घेण्यासाठी तिचा छळ सुरू करण्यात आलेला होता. कुटुंबीयांना देखील तिने या प्रकरणी कल्पना दिली यानंतर माहेरच्या व्यक्तींनी सासरच्यांसोबत बोलणे केले मात्र त्याचा देखील राग सासरच्या व्यक्तींना आला आणि त्यांनी नवविवाहितेला माहेरच्या व्यक्तींपासून बोलण्यास देखील अडवायला सुरू केले.
आरोपी पतीने तिचा मोबाईल देखील ताब्यात घेतला त्यानंतर माहेरच्या व्यक्तींसोबत तिचा संपर्कच राहिला नाही आणि सासरच्यांकडून सातत्याने छळ सुरू असल्याने अखेर रविवारी पहाटेच्या सुमारास तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नेरूळ पोलीस ठाण्यात धाव घेत तिच्या घरच्यांनी अखेर सासू आणि पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून टोकाचे पाऊल उचलताना आपला छळ करणाऱ्या व्यक्तींवर कारवाईसाठी तिने अंतर्वस्र्त सुसाईड नोट लपवून ठेवलेली होती. पंचनाम्याची वेळी ही चिठ्ठी आढळून आलेली असून आरोपी पती आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.