पती-पत्नी म्हटल्यानंतर नात्यात प्रेमसंबंध असतात मात्र त्यातून अनेकदा आपल्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतर हा विरह सहन करणे कल्पनेच्या पलीकडचे असते अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यात समोर आलेली असून पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर सोलापूर येथील 41 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात छताच्या वाश्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सचिन मधुकर गोफणे ( वय 41 राहणार न्यू लक्ष्मी चाळ ) असे मयत व्यक्तीचे नाव असून सचिन हे पुण्यात राहत असायचे. पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांना दिसणे कमी झालेले होते त्यामुळे आठ दिवसांपूर्वीच ते सोलापूर येथे आलेले होते. शनिवारी दुपारी राहत्या घरात दार पुढे करून त्यांनी लाकडी वाशाला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला त्यात त्यांचा मृत्यू झालेला होता.
सदर प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकाराची माहिती फौजदार चावडी पोलिसांना दिली त्यानंतर हवालदार बी एन परीट यांनी घटनास्थळी पोहोचून नातेवाईकांच्या सहाय्याने खाली उतरवून छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे .