पिवळा दोरा गळ्यात बांधून म्हणाला चल बायको लॉजवर , पोलीस पोहचले तेव्हा

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सोलापूर इथे समोर आलेली असून एका रिक्षातून घेऊन जात गळ्यात पिवळा दोरा बांधून लग्न झालेले आहे असे सांगत एका पन्नास वर्षे व्यक्तीने तरुणीवर अत्याचार केलेला आहे . सोलापूर शहरात ही धक्कादायक घटना समोर आलेली असून पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , मनम व्यंकटप्पा रामगड ( वय 52 ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून पीडित तरुणी ही कर्नाटक येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. सध्या शहरातील ती तिच्या कुटुंबासोबत राहत असून 17 जुलै रोजी आपल्या नातलगाला दवाखान्यात दाखवण्यासाठी म्हणून ती निघालेली होती त्यावेळी आरोपी ओळखीचा होता म्हणून त्याने त्यानंतर तिला घरी सोडतो म्हणून स्वतः सोबत रिक्षात बसवले.

रिक्षातून घरी जात असताना आरोपीने रिक्षा मित्राच्या घरी वळवली आणि तेथून एका लक्ष्मी मंदिरात तिला घेऊन गेला आणि तिथे मंदिरामध्ये तिच्या गळ्यात एक पिवळा दोरा बांधला आणि त्यानंतर आपण आता पती-पत्नी झालेलो आहोत असे सांगत एका लॉजवर घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला असे तरुणीने फिर्यादीत म्हटलेले आहे.

आरोपीने घटना घडल्यानंतर देखील तिला लॉजवरच ठेवलेले होते . घरी सोडण्यास देखील तो तयार नव्हता त्यानंतर 22 जुलै रोजी अचानकपणे लॉजवर पोलीस आले त्यावेळी आरोपी आणि पीडित तरुणी दोघेही तिथे आढळून आले त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले . दरम्यानच्या काळात पीडित मुलीच्या भावाने पोलिसांमध्ये बहीण हरवल्याची तक्रार दिली होती. आरोपीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.


Spread the love