चक्क पीआय साहेबांचेच अकाऊंट हॅक , पुतण्याला मेसेज गेला अन..

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून चक्क पोलीस निरीक्षक असलेल्या व्यक्तीचे अकाउंट हॅक करून त्यांच्या नातेवाईकाचीच फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. सायबर चोरट्यांनी फर्निचरचे फोटो पाठवत पैसे पाठवायला भाग पाडून तब्बल 70 हजार रुपयांची एका व्यक्तीची फसवणूक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , स्वागत नवनाथ गोसावी ( वय 36 राहणार हडपसर ) असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव असून त्यांचे चुलते संतोष गिरी गोसावी ( राहणार खराडी ) हे पोलीस निरीक्षक पदी कार्यरत आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांचे अकाउंट हॅक केले आणि त्याचा वापर करत स्वागत गोसावी यांना मेसेज केला.

फिर्यादी व्यक्ती यांना आपल्यासोबत आपले चुलतेच बोलत आहेत असे वाटले आणि त्यानंतर फिर्यादी यांनी वेगवेगळ्या नंबरवर त्यांनी फोन केले आणि त्या मोबाईल नंबरवर वरून फिर्यादी यांना व्हाट्सअपवर फर्निचरचे फोटो पाठवण्यात आले आणि तात्काळ पेमेंट म्हणून सुमारे ७० हजार रुपये पाठवण्यास भाग पाडले. आपली फसवणूक झाल्यानंतर स्वागत गोसावी यांनी हडपसर पोलिसात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे.


Spread the love