महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात समोर आलेला असून एका गावामध्ये विवाहित असलेल्या मजूर महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेला आहे. पीडित महिलेने शिरूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केलेली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , पीडित महिलेला तीन मुले असून दोन जण शिक्षणासाठी बाहेरगावी राहतात आणि पीडित महिला पतीसोबत शेतमजुरीचे काम करते. दोन एकर जमिनीवर पेरलेल्या बाजरीची खुरपणी करण्यासाठी ती एकटीच गावी आलेली होती त्यानंतर ती खुरपणी करून पुन्हा परतली मात्र घराचा नादुरुस्त असलेला दरवाजा लोटून ती झोपी गेलेली असताना पाणी पिण्याचा बहाणा करत तिच्या गावातील एक व्यक्ती घरात घुसला आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला.
पीडित महिलेने विरोध केला असता त्याने तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली असून त्यानंतर पीडित महिलेने पोलीस ठाणे गाठत आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे. पोलीस निरीक्षक गणेश धोकरट यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सोनवणे आणि जायभाये यांनी आरोपीला अटक केलेली आहे.